प्रतिनिधी / वृत्तसंस्था
वाशीम : यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी 72 कोटींच्या घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय (ईडीने) छापे घातले आहेत.ईडीची टीम या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करीत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.72 crore scam in Washim ED raids Shiv Sena MP Bhavana Gawli’s educational institutions at 9 places
पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.
२००६ चे प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभे करण्यात आले होते. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आलेला.
दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावन गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचं असं प्रकार आहे. केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला
https://twitter.com/ComeOverHereTM/status/1432253138883342340?s=20
५५ कोटींमध्ये. आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त २५ लाख रुपये देऊन काबीज घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढंच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. मी ईडीच्या या कारवाईचं स्वागत करतो, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या भावना गवळी या कन्या आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App