विशेष प्रतिनिधी
नागपूर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रविवारी, ११ डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचे उद्घाटन करतील. ७०१ किलोमीटर लांबी आणि एकूण प्रकल्प ५५ हजार ३३५.३२ कोटींचा खर्च करण्यात आलेला हा हरित महामार्ग विविध वैशिष्ट्यांनी संपन्न आहे. 701 km length, cost of 55335 crores; This prosperity highway of development of Maharashtra
या प्रकल्पाला २२ डिसेंबर २०१९ रोजी सरकारने “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे नाव देण्यात आले आहे. पूर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे आणि त्यापोटी मोबदला म्हणून ८००८.९७ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी वन विभागाची एकूण ५४६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून, वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. बांधकाम पॅकेज १ ते २३ चे काम ३० महिन्यांच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित होते. यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित होते. तथापि, कोविड-१९ या महामारीच्या प्रथम आणि द्वितीय लाटेमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शासन निर्णयानुसार कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार संपूर्ण प्रकल्प माहे जुलै-२०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
१३८.४७ मेगावॉट सौर उर्जा निर्मिती
५२० किलोमीटचा मार्ग खुला होणार
सद्यस्थितीत नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटर लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App