महाराष्ट्रात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ; ७०० कोटींचा निधी मंजूर

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शिंदे – फडणवीस सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात, त्यांना याचा लाभ होणार आहे. 700 cr. sanctioned by shinde Fadanavis government for farmers of maharashtra

Rich Farmers : श्रीमंत शेतकऱ्यांची कडक इन्कम टॅक्स छाननी होणार; कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे शेतकरी नियमित कर्जफेड करणार आहेत, त्यांना ५० हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सभागृहात घोषित केला होता. त्यानंतर या योजनेसाठी १६ सप्टेंबर २०२२ रोजी २३५० कोटी वितरित केले होते. मग १८ ऑक्टोबरला ६५० कोटी आणि त्यानंतर आता ७०० कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४७०० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी योजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही मिळाल नाही. पण उद्धव ठाकरे यांचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखवले आहे.

700 cr. sanctioned by shinde Fadanavis government for farmers of maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात