या दुर्घटनेत किमान ३०-४० जण जखमी झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
अकोला : राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. अनेक ठिकाणी तर गारपीटही झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात काल सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे मंदिरवरील पत्र्याच्या शेडवर जुने झाड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३०-४० जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोलाच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. 7 people dead while many injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall
पारस गावात बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या शेडखाली अनेक भाविक उभे होते. त्यातील अनेक जण त्याखाली दबले गेले.
Maharashtra | 7 people dead while 30-40 were injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall yesterday evening. Injured were taken to hospital: Nima Arora, Collector, Akola pic.twitter.com/dKdscUUwLA — ANI (@ANI) April 9, 2023
Maharashtra | 7 people dead while 30-40 were injured after an old tree fell on a tin shed in Paras village in Akola district due to rainfall yesterday evening. Injured were taken to hospital: Nima Arora, Collector, Akola pic.twitter.com/dKdscUUwLA
— ANI (@ANI) April 9, 2023
या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, ३०-४० जण जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App