प्रतिनिधी
पुणे, – वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे असे सांगून भामटयांनी ६५ लाख ७० हजार रुपयांची फसवणुक करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी सरुपम कुमार,राेहीत भदाेरीया, विश्वजीत सिंग, अभिषेक राज व अभिनव यादव (सर्व रा.पुणे) यांचे विराेधात डेक्कन पाेलीस ठाण्यात अार्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे.65 lakh fraud under the pretext of getting admission in medical college
याबाबत संजय रमेश खत्री (रा.जुन्नर,पुणे) यांनी अाराेपीं विराेधात पाेलीसांकडे तक्रार दिली अाहे. संबंधित अाराेपींची शिवाजीनगर परिसरातील घाेले राेड याठिकाणी एका इमारतीत स्कायटेक प्रा.लि. नावाची कंपनी अाहे. सदर अाराेपींनी संगनमत करुन संजय खत्री व इतर विद्यार्थ्यांचे पालकांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे
तसेच पअवेश निश्चित करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये अाणि बीएएमएससाठी तीन लाख रुपये अागाऊ रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी सुरुवातीला १८ लाख रुपये स्कायटेक कंपनीचे नावे चेक व अारटीजीएसद्वारे भरले. परंतु त्यांच्या पाल्यांचा प्रवेश केला गेला नाही.
त्यानंतर मध्यप्रदेशातील इंदूर येथील अमलताश मेडिकल काॅलेज व इंडेक्स मेडिकल महाविद्यालय याठिकाणी प्रवेश मिळवून देताे असे अाश्वासन देऊन अाराेपींनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन त्यांना ४७ लाख ७० हजार रुपये भरण्यास लावले. अशाप्रकारे एकूण ६५ लाख ७० हजार रुपयांचा अ्ाराेपींनी स्विकार करत वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश करुन न देता फसवणुक केली अाहे. याबाबत डेक्कन पाेलीस पुढील तपास करत अाहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App