वृत्तसंस्था
दावोस : Devendra Fadnavis दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 6 लाख 25 हजार 497 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 1 लाखाच्या वर इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला आहे. तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.Devendra Fadnavis
Maharashtra is creating history..🚩Maharashtra bags whopping ₹6,25,457 crore of investments at Davos in just one day under the leadership of CM Devendra Fadnavis !And this is just the beginning…To be contd…@Dev_Fadnavis @wef#WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos pic.twitter.com/SNJGGdoIHt — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2025
Maharashtra is creating history..🚩Maharashtra bags whopping ₹6,25,457 crore of investments at Davos in just one day under the leadership of CM Devendra Fadnavis !And this is just the beginning…To be contd…@Dev_Fadnavis @wef#WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos pic.twitter.com/SNJGGdoIHt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2025
सज्जन जिंदाल यांनी यावेळी म्हटले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके नेतृत्व में तैयार हो रहा है नया महाराष्ट्र।जेएसडब्ल्यू ग्रुप के अध्यक्ष सज्जन जिंदल ने महाराष्ट्र में 'इज़ ऑफ़ डूइंग बिज़नेस' की तारीफ़ करते हुए कहा 'जो एक बार महाराष्ट्र में निवेश कर ले, वो फिर कहीं और निवेश नहीं कर सकता। निवेशकों की पहली पसंद… https://t.co/QgIx4JYex9 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके नेतृत्व में तैयार हो रहा है नया महाराष्ट्र।जेएसडब्ल्यू ग्रुप के अध्यक्ष सज्जन जिंदल ने महाराष्ट्र में 'इज़ ऑफ़ डूइंग बिज़नेस' की तारीफ़ करते हुए कहा 'जो एक बार महाराष्ट्र में निवेश कर ले, वो फिर कहीं और निवेश नहीं कर सकता।
निवेशकों की पहली पसंद… https://t.co/QgIx4JYex9
दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.
फ्युएलची पुण्यात संस्था
यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.
सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…
(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)
आतापर्यंत झालेले सामंजस्य करार एकूण : 4,99,321 कोटींचे
1) कल्याणी समूह क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही गुंतवणूक : 5200 कोटी रोजगार : 4000 कोणत्या भागात : गडचिरोली
2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. क्षेत्र : संरक्षण गुंतवणूक : 16,500 कोटी रोजगार : 2450 कोणत्या भागात : रत्नागिरी
3) बालासोर अलॉय लि. क्षेत्र : स्टील आणि मेटल्स गुंतवणूक : 17,000 कोटी रोजगार : 3200
4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि. क्षेत्र : स्टील आणि मेटल्स गुंतवणूक : 12,000 कोटी रोजगार : 3500 कोणत्या भागात : पालघर
5) एबी इनबेव क्षेत्र : अन्न आणि पेये गुंतवणूक : 750 कोटी रोजगार : 35 कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
6) जेएसडब्ल्यू समूह क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स गुंतवणूक : 3,00,000 कोटी रोजगार : 10,000 कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली
7) वारी एनर्जी क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे गुंतवणूक : 30,000 कोटी रोजगार : 7500 कोणत्या भागात : नागपूर
8) टेम्बो क्षेत्र : संरक्षण गुंतवणूक : 1000 कोटी रोजगार : 300 कोणत्या भागात : रायगड
9) एल माँट क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : 2000 कोटी रोजगार : 5000 कोणत्या भागात : पुणे
10) ब्लॅकस्टोन क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान गुंतवणूक : 25,000 कोटी रोजगार : 1000 कोणत्या भागात : एमएमआर
11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी क्षेत्र : डेटा सेंटर्स गुंतवणूक : 25,000 कोटी रोजगार : 500 कोणत्या भागात : एमएमआर
12) अवनी पॉवर बॅटरिज क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक : 10,521 कोटी रोजगार : 5000 कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
13) जेन्सोल क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक : 4000 कोटी रोजगार : 500 कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
14) बिसलरी इंटरनॅशनल क्षेत्र : अन्न आणि पेये गुंतवणूक : 250 कोटी रोजगार : 600 कोणत्या भागात : एमएमआर
15) एच टू ई पॉवर क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : 10,750 कोटी रोजगार : 1850 कोणत्या भागात : पुणे
16) झेड आर टू समूह क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स गुंतवणूक : 17,500 कोटी रोजगार : 23,000
17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही गुंतवणूक : 3500 कोटी रोजगार : 4000 कोणत्या भागात : पुणे
18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने) क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : 8000 कोटी रोजगार : 2000
19) बुक माय शो क्षेत्र : करमणूक गुंतवणूक : 1700 कोटी रोजगार : 500 कोणत्या भागात : एमएमआर
20) वेल्स्पून क्षेत्र : लॉजिस्टीक गुंतवणूक : 8500 कोटी रोजगार : 17,300
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App