विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : Maharashtra राज्यातील सहा जहाल माओवाद्यांनी 24 सप्टेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर तब्बल 62 लाख रुपयांचा इनाम होता. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएस असून या सर्वांना आता शासनाकडूनच 52 लाख रुपये देण्यात येणार आहे. यावेळी रश्मी शुकला यांच्या हस्ते या माओवाद्यांच्या हाती संविधान सोपवण्यात आले.Maharashtra
यावेळी भिमान्ना उर्फ व्यंकटेश उर्फ सुखलाल मुतय्या कुळमेथे (वय 58, डीव्हीसीएम, उत्तर बस्तर), त्याची पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरक्का विस्तारय्या सडमेक (वय 56, डीव्हीसीएम, माड डिव्हिजन), कविता ऊर्फ शांती मंगरू मज्जी (34, कमांडर, वेस्ट ब्युरो टेलर टीम), नागेश ऊर्फ आयताल गुड्डी मडावी (39, पीपीसीएम, कंपनी नं. 10), समीर आयतू पोटाम (24, पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्निकल टीम) आणि नवता ऊर्फ रूपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (28, एसीएम, अहेरी दलम) यांचा समावेश आहे. पोलिस मुख्यालयातील एकलव्य सभागृहातील कार्यक्रमास अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, अपर पोलिस महासंचालक , विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश अपर, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी., उपकमांडंट सुमित वर्मा,सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपअधीक्षक विशाल नागरगोजे उपस्थित होते.Maharashtra
गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवायांना मोठे यश मिळाले असून, ७३ माओवादी कार्यकर्त्यांनी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले आहे. यात केवळ २०२५ मध्येच आतापर्यंत ४० जणांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या कामगिरीबद्दल पोलिस दलाचे कौतुक केले.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतीच गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी माओवाद्यांच्या विरोधात झालेल्या यशस्वी चकमकींमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व जवानांचा गौरव केला. त्यांनी कवंडे, कोपर्शी-फुलनार आणि मोडस्के जंगल परिसरातील चकमकींमध्ये शौर्य दाखवलेल्या जवानांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
माओवादी हिंसाचारातील पीडितांना मदत
यावेळी, माओवादी हिंसाचारात प्राण गमावलेल्या दोन निष्पाप नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली. या संवेदनशील कृतीतून पोलिस दलाने पीडितांप्रती आपली सहानुभूती आणि जबाबदारी दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App