शासकीय नोकरीही देणार ; महाराष्ट्र सरकारकडून घोषणा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून, ज्यांच्या कुटुंबात रोजगाराची गरज आहे, अशा वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय जाहीर केला.
बैठकीपूर्वी हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले, “या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची व रोजगाराची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. त्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल.” हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर देशभऱातून संताप व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App