उद्धवसेनेच्या 40 % नेत्यांची ‘महामोर्चा’ला दांडी; दिली वेगवेगळी कारणे

प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत काढलेल्या हल्लाबोल महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता असा दावा प्रमुख नेत्यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या मोर्चात केवळ काही हजारांमध्ये गर्दी असल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. अशातच उद्धवसेनेच्या औरंगाबादमधील ४० % मोठ्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी घरगुती कारणे देत ‘महामोर्चा’ला दांडी मारली. 40% of Uddhav Sena leaders join ‘Mahamorcha’; Various reasons given

‘हे’ कारण देत नेत्यांनी मारली दांडी! 

या ४० % मोठ्या पदाधिकाऱ्यांनी कौटुंबिक कारण देत महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्च्याला दांडी मारली. तर सामान्य कार्यकर्ते अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



औरंगाबाद शहरातून किमान ५ हजार जणं मोर्च्याला जातील, अशी अपेक्षा असतना केवळ १५०० जणच या मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेळी  बहुतांश जणांनी स्वखर्चाने प्रवास केला होता तर औरंगाबाद जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी म्हणाले, कोण आले नाही, याचा आढावा मी घेईन परंतु, अनेकांनी वैयक्तिक कारणे सांगून माझी परवानगी घेतली होती.

कोणी सर्वाधिक दर्शविली उपस्थिती

महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचेही समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा होता, असे मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी सांगितले. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हुकूमशाही नव्हे तर शिवशाहीचे समर्थक होते, असा दावा हर्सूल येथील संजय हरणे यांनी केला आहे.

40% of Uddhav Sena leaders join ‘Mahamorcha’; Various reasons given

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात