विशेष प्रतिनिधी
मुंबई : नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या इथपर्यंत आता अजितदादांचे बंड येऊन ठेपले आहे. अजितदादांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांनी पाठिंबा देऊन तशा स्वाक्षरी देखील केल्या आहेत, अशी बातमी आली आहे. पण ही बातमी येतानाच शरद पवारांनी अद्याप कोणताही “प्रतिडाव” रचलेला नाही आणि भाजपच्या फायनल कॉलची प्रतीक्षा आहे ही देखील बातमी आली आहे.40 MLAs Support Ajitdad’s Rebellion; Sharad Pawar still has no “resistance”??; Waiting for BJP’s final call??
अजितदादा बंड करणार ही चर्चा गेल्या 15 – 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रात जोरावर आहे. त्यामध्ये वेगवेगळे दावे – प्रतिदावेही केले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि अन्य 16 आमदार यांच्यावर सुप्रीम कोर्ट पात्रतेची कारवाई करणार त्यामुळे एकनाथ शिंदेंना जावे लागणार त्यांच्या ऐवजी अजित पवार येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण त्याचवेळी भाजप अतिशय सावध पावले टाकत आहे. अजितदादांचे बंड 2019 मध्ये फसले होते. फडणवीस आणि अजितदादांच्या शपथविधीला राजभवनात गेलेल्या राष्ट्रवादीच्या बाराही आमदारांना स्वतः शरद पवारांनी फोन करून राष्ट्रवादीच्या गोटात परत आणले होते. त्यामुळे अजितदादांचे 2019 चे बंड फसले तशी कोणतीही “रिस्क” भाजपचे वरिष्ठ नेतृत्व घेऊ इच्छित नाही, भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
पण या दरम्यानच्या काळात अजितदादांच्या पाठिंब्यासाठी 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्या होऊनही शरद पवारांनी मात्र अद्याप कोणताही “प्रतिडाव” रचल्याची बातमी नाही. याचा अर्थ शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जरी राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही, असा शब्द दिला असला तरी तो शब्द खरा नसून शरद पवारांचा अजितदादांच्या बंडाला यावेळी छुपा पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.
सरकार पडू नये म्हणून…
सुप्रीम कोर्टाच्या निकालात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 16 आमदारांचा पात्रतेचा निकाल काहीही लागो, त्या निर्णया आधीच एकनाथ शिंदे बाजूला होतील आणि त्यांच्या जागी अजितदादा येतील जेणेकरून विद्यमान सरकारला डग लागणार नाही आणि सरकार पडणार नाही, अशी व्यूहरचना भाजपने केल्याचे सांगितले जात आहे. त्यातही कर्नाटक निवडणुकीत मतदान होण्याआधी महाराष्ट्रात राजकीय घडामोड घडविण्याच्या हालचाली आहेत, अशी भाजपच्या अंतर्गत सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App