नाशिक : ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे डाव, तिथे जाऊन फडणवीसांची खेळी; राष्ट्रवादी झाली “खाली”!!, ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली. शरद पवारांच्या डाव टाकल्याच्या खेळी केल्याच्या बहुतांश बातम्या सोलापूर जिल्ह्यातूनच यायच्या तेच तिथे माढा, मोहोळ, मंगळवेढा आदी गावांमध्ये जाऊन डाव टाकायचे. तिथले विरोधक फोडायचे आणि आपल्या गळ्याला लावायचे त्याचीच भलामण करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमे द्यायची त्यातून शरद पवार मोठे चाणक्य असल्याचे चित्र निर्माण करायची.
पण ज्या सोलापूर जिल्ह्यात जाऊन शरद पवार “डाव” टाकायचे, त्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकला आणि अख्खी राष्ट्रवादी “खाली” करून टाकली. यात अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा भरडली गेली. सोलापूर जिल्ह्यातले चार माजी आमदार देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या गळाला लावले. सोलापूर जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता आणायची या हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची सुमडीत कोंबडी कापली.
– भाजपच्या एकहाती वर्चस्वासाठी…
सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचा दोनच दिवसांपूर्वी तिथे दौरा झाला. ते पंढरपूरला सुद्धा जाऊन आले. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मोठी मीटिंग झाली. त्या मिटींगला माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे यांची दोन मुले आणि दिलीप माने हजर राहिले होते. या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. भाजपचा विस्तार करायचा असल्याने सगळ्यांना पक्षाचा विचार करून ऍडजेस्ट करू. कोणावरही राजकीय अन्याय करणार नाही, असा शब्द फडणवीसांनी सगळ्यांना दिला. त्यामुळे एकेकाळी भाजपच्या विरोधात विधानसभा निवडणुका लढलेले सगळे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करायला तयार झाले. सोलापूर जिल्हा परिषद एकहाती ताब्यात घेण्यासाठी भाजपला मदत करायला कबूल झाले. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला. मोहिते पाटलांच्या घराण्याला राजकीय सुरुंग लागला.
– मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग
धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची गद्दारी करून शरद पवारांच्या पक्षात जाऊन खासदारकी मिळवली, त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना धडा शिकवू, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्याचेच पहिले पाऊल म्हणून फडणवीस यांनी एका झटक्यात सोलापूर जिल्ह्यातले चार माजी आमदार भाजपच्या गळाला लावले. मंत्री जयकुमार गोरे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी या राजकीय खेळीत फडणवीस यांना साथ दिली. त्यामुळे ज्या जिल्ह्यात भाजपचे राजकीय अस्तित्व दोन तीन आमदार आणि एखाद्या खासदार एवढ्या पुरते मर्यादित होते तिथे आता भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण व्हायची शक्यता तयार झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App