विशेष प्रतिनिधी
मुंबई : Zilla Parishad राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.Zilla Parishad
गत दोन ते अडीच वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका केव्हा होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण आता राज्य सरकारने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.Zilla Parishad
सरकारच्या परिपत्रकानुसार, ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तर साताऱ्याची जागा मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असणार आहे. पालघरची जागा एसटीसाठी, पुणे व रायगडचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी, तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.Zilla Parishad
जिल्हानिहाय यादी
ठाणे सर्वसाधारण (महिला) पालघर अनुसूचित जमाती रायगड सर्वसाधारण रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) नंदूरबार अनुसूचित जमाती जळगाव सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला) पुणे सर्वसाधारण सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सांगली सर्वसाधारण (महिला) सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण (महिला) छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) बीड अनुसूचित जाती (महिला) हिंगोली अनुसूचित जाती नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) लातूर सर्वसाधारण (महिला) अमरावती सर्वसाधारण (महिला) अकोला अनुसूचित जमाती (महिला) परभणी अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती (महिला) बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण (महिला) चंद्रपूर अनुसूचित जाती (महिला) गडचिरोली सर्वसाधारण (महिला)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App