वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली.300 houses will be given to all party MLAs in Mumbai; Big announcement of Thackeray government in the assembly
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मोठी घोषणा केली. मुंबईतील गोरेगावमध्ये ग्रामीण भागांतून येणाऱ्या आमदारांसाठी ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईत ज्या आमदारांची घरे नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत,
असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असे त्यांनी सभागृहात सांगितले. अनेक आमदार हे राज्याच्या ग्रामीण भागांतून मुंबईत येत असतात. ते आमदार आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्वाचे नाही. पण त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही आव्हाड म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App