विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhiwandi उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3 लाख रुपये जमा करून पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.Bhiwandi
मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (वय 22, रा. सहारा अपार्टमेंट्स), अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (वय 22, रा. गुलजार नगर) आणि जैद नोटियार अब्दुल कादिर (वय 22, रा. वेताळ पाडा) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. सध्या तपास यंत्रणा त्यांची कसून चौकशी करत आहेत.Bhiwandi
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत भिवंडीतून लाखोंची रक्कम पॅलेस्टाइनला पाठवली जात असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे यूपी एटीएसचे एक पथक शुक्रवारी भिवंडीत दाखल झाले. त्यांनी दिवसभर संशयितांवर पाळत ठेवली आणि शनिवारी दुपारी अचानक गुलजार नगर भागातील एका इमारतीवर छापा टाकून अबू सुफियान तजम्मुल अन्सारी याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.Bhiwandi
चौकशीदरम्यान अबू सुफियानने त्याचे दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर यांची नावे सांगितली. त्यानंतर एटीएस पथकाने शांतीनगर आणि निजामपुरा पोलिसांच्या मदतीने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या तिघांनीही दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करून पाठवल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांना लखनऊच्या एटीएस कार्यालयात नेण्यात आले
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या तिन्ही तरुणांना पुढील तपासासाठी लखनऊमधील एटीएस कार्यालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. या तरुणांवर संशयास्पद देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असून, तपास यंत्रणा त्यांची कसून चौकशी करत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात दहशतवादी कारवायांचे धागेदोरे असल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्ली पोलिसांनी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका येथून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. त्यानंतर आता भिवंडीतील तिघांना अटक करण्यात आल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App