दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!

3.53 lakh crore record investment deal in Davos

प्रतिनिधी

मुंबई : स्वित्झर्लंड मधील दावोस शहरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेची यशस्वी सांगता करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळून त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. 3.53 lakh crore record investment deal in Davos

दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून १ लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवले आहे. तसेच राज्यात येणाऱ्या या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ लाखांपर्यंत रोजगार निर्मिती होणार आहे. आर्सेनिल मित्तल, निप्पोन यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, जिंदाल, अदानी यांसारख्या देशांतर्गत नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. गतवर्षी प्रमाणेच यावर्षी केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील असे यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रा.मनीषा कायंदे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के तसि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3.53 lakh crore record investment deal in Davos

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात