प्रतिनिधी
नाशिक : नाशिक गोदावरी घाटावरील पाडवा पटांगणात नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.25000 thousand square foot “Panchamahabhute” Maharangoli of environment protection was realized at Padwa Patangan of Nashik!!
नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी फाल्गुन कृ. १४ अर्थात सोमवार २० मार्च २०२३ रोजी, सकाळी ६ वाजेपासून ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून हि “महारांगोळी” साकारण्यात आली आहे.
तब्बल २५००० स्वेअर फुट अशा या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत ही महारांगोळी साकारली आहे.
रांगोळी साकारतांना पर्यावरणाचा समतोल हा पंचमहाभूतांवर अवलंबून आहे, आपले शरीर, पृथ्वी तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे अशी आपली धारणा आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल बिघडला की पर्यावरणाचाही समतोल बिघडतो. पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे. रांगोळी मध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी देखील साकारण्यात आली आहे. मानवी शरीर, पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतानी बनलेले आहे हे दाखवण्यासाठी रांगोळीमधे त्यांचा अंतरभाव केला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे दाखवण्यासाठी वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूर परिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रांगोळीचित्रात रेखाटले आहेत.आणि या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून वृक्षारोपण, हरित उर्जेचा वापर, अग्निहोत्र, तुळस यासारख्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये विचार केलेल्या पृथ्वी, आप(पाणी), तेज(अग्नी), वायू व आकाश या पाच तत्त्वांना पंचमहाभूते म्हणतात ते साकारत पर्यावरण समतोलासाठी उपयुक्त बाबींचा उहापोह करणारी मानवकल्याणकारी अशा या महारांगोळीचे प्रयोजन करण्यात आले होते.
या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत एकत्रितपणे येऊन हि हि महारांगोळी साकारली होती.
या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. यावेळी सौ.भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर सौ. मंजुषा नेरकर व सौ.सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले, सकाळी ६ वाजता या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मेघवाल समाजाचे थोर समाजसेवक श्री रामजी पाळजी मारू, यांच्या सूनबाई श्रीमती हिरुबेन धुडा मारू व श्री राम पला मारू, दिपाली गीते यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता आदिवासी विकास मंडळाच्या आयुक्त नयना गुंडे, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या महा रांगोळीचा अनावरण सोहळा पार पडला , यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे देखील पाडवा पटांगण गोदाघाट येथे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत, यांनी विशेष मेहनत घेतली. ही महारांगोळी पाडवा पटांगणावर दोन दिवसाकरिता ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी ती बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.
मृत्युंजय दिनानिमित्त स्वत्व जागरण
मंगळवार (दिनांक २१ मार्च २०२३) रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ (सायंकाळी ६ वा.) सादर केली जाणार आहेत, तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शनी’ (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत) मांडणार आहोत. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे श्री. लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत. याकरिता सर्व नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App