प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवाला मुंबई-पुण्यातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. नोकरीसाठी पुण्यात आलेल्या कोकणवासीयांना पुण्यातच 2 वर्षे गणेशोत्सव साजरा करावा लागला. 250 trains of ST to go from Pune to Konkan
परंतु यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने चाकरमान्यांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी 250 विशेष बसची व्यवस्था पुणे एसटी विभागातर्फे करण्यात आली आहे. यासह इतर शहरांमध्ये जाण्यासाठी देखील 150 स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– 250 विशेष बसची व्यवस्था
कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी 170 बस नियुक्त केल्या असून त्यातील 120 बस संपूर्ण बुक झाल्या आहेत. यासह 30 बस ग्रुप बुकिंगद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. बस स्थानकावरून गणेश भक्तांसाठी 27 ऑगस्टपासून 50 स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या शहरात जाण्यासाठी 150 स्वतंत्र बसची व्यवस्था पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more