धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वादावरून राष्ट्रवादीतच 2 पवारांचे 2 गट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. मात्र अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अपमानच केला आहे. स्वतः शरद पवारांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच 2 पवारांचे 2 गट पडले आहेत. एक गट शरद पवारांचा आणि दुसरा गट अजित पवारांचा झालेला दिसतो आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 2 factions of 2 Pawars in NCP due to Dharamveer Chhatrapati Sambhaji Maharaj dispute

बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्या युतीची घोषणा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवामानाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आक्रमकपणे अजितदादांचा समाचार घेतला. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी काय आता मिळालेली नाही किंवा ती अजितदादांनी दिलेली नाही.

ती सर्व समाजाने दिली आहे. कारण ते धर्मवीरच आहेत. औरंगजेबाचा सगळा छळ सहन केल्यानंतर सुद्धा संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्म सोडला नाही म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हणतात, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली. शरद पवारांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले आहे आणि अजितदादा जर अजूनही त्यांना धर्मवीर म्हणत नसतील तर याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच शरद पवारांचा एक गट आणि अजितदादांचा दुसरा गट अशी फूट पडल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा समाचार

त्याचवेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे. धर्मवीर संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून त्यांचा छळ करून मारणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर अनेक मंदिर तोडली तरीही त्याचा तरी त्याचे उदात्तीकरण होत असेल तर अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

2 factions of 2 Pawars in NCP due to Dharamveer Chhatrapati Sambhaji Maharaj dispute

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub