विशेष प्रतिनिधी
हिंगोली : Maratha Reservation हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांना मदतीसाठी 2.20 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून पुढील काही दिवसांतच आवश्यक पडताळणी करून सदर मदतीचे त्यांच्या वारसांना वाटप केले जाणार आहे.Maratha Reservation
हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी मोठे आंदोलन उभे राहिले होते. मनोज जरांगे पाटील यांची हिंगोली जिल्ह्यात सभा देखील झाली होती. त्यानंतर वेळोवेळी बैठका होऊन मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात रास्तारोको करण्यात आले होते.Maratha Reservation
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील 22 जणांनी चिट्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी शिक्षण घेऊनही केवळ आरक्षण नसल्यामुळे नोकरीच्या अनेक संधी हुकल्याचे चिठ्ठीत नमुद करून आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त तरुणांचा समावेश होता.Maratha Reservation
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरु केल्यानंतर शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू केले. या शिवाय आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची निधी देण्याची घोषणाही केली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 22 आत्महत्याग्रस्त तरुणांचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून 2.20 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांतच सर्व प्रक्रिया पूर्ण करून आत्महत्याग्रस्त तरुणांच्या वारसांना मदत दिली जाणार आहे.
यामध्ये जगदीश कदम, गजानन इंगोले, मुंजाजी शिंदे (कुरुंदा), चंद्रकांत पतंगे (कांडली), विलास वामन (माळसेलू), निवृत्ती सवंडकर (टेंभुर्णी), पांडूरंग सुर्यवंशी (चिखली), गोविंद राखोंडे (नालेगाव), अर्जुन पानधोंडे (पळसगाव), प्रविण कल्याणकर (कंजारा), एकनाथ चव्हाण (गुंडा), नागोराव कदम (अकोली), संतोष दुर्गे (कान्हेगाव), माणिक पडघान (पोटा बुद्रूक), राजेश्वर कानोडे (तेलगाव), साईनाथ पडोळे (मुडी), गोविंद खराटे (पिंपरी बुद्रूक), कपिल मगर (सिंदगी), संदीप देशमुख (डोंगरगावपुल), राजू काळे (येहळेगाव तुकाराम), दिलीप काळे (आखाडा बाळापूर) यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. या संदर्भातील पत्र मुख्यामंत्री सचिवालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App