प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला अखेरची घरघर लागलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या खात्यांचे आणि आमदारांचे आर्थिक भरण-पोषण चालवल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेतच. 160 gr in 48 hours: Indiscriminate decision of Mahavikas Aghadi government
मात्र आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या या घाईगडबडीतील गोंधळातील निर्णयाकडे दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचे लक्ष वेधले असून गेल्या 48 तासांत या अस्थिर सरकारने तब्बल 160 जीआर काढले आहेत. त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp — Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) June 24, 2022
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) June 24, 2022
“राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र,” असे ट्विट प्रवीण तर दरेकर यांनी करून आपल्या ट्विटर हँडलवर ते शेअर केले आहे. हे पत्र वाचा त्यांच्याच शब्दात :
– राजकीय परिस्थिती अस्थिर असताना कोट्यावधी रुपयांचा निधी विकासकामांच्या नावाखाली वाटला जात आहे.
– अडीच वर्ष झोपलेल्या सरकारने 48 तासांत 160 जीआर काढले आहेत.
– पोलिसांच्या बदल्यांचाही घाट घातला जात आहे. पोलीस बदली प्रकरणातच याच महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्र्यांना तुरुंगात जावे लागले आहे.
– आपण तातडीने या अंदाधुंद कारभारात हस्तक्षेप करून महाविकास आघाडी सरकारच्या या संशयास्पद व्यवहारांना रोखावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App