देशातील गर्भश्रीमंतांच्या यादीत नवीन 149 जण वाढले : 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणारे 1103 भारतीय


वृत्तसंस्था

मुंबई : आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट-२०२२ प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी १०.९४ लाख कोटी संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी(७.९४ लाख कोटी) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.149 new additions to country’s rich list 1103 Indians with assets above Rs 1000 crore



देशाच्या १२२ शहरांमध्ये १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणारे ११०३ लोक आहेत. यादीतील नव्या १४९ लोकांमध्ये २० केमिकल उद्योगातील आहेत. सर्वात जास्त १२६ नावे औषध निर्मिती उद्योगातील आहेत. या १४९ जणांची एकूण संपत्ती ३,१८,२०० कोटी रु. आहे. या वर्षी २२१ अब्जाधीश असून २०२१ च्या यादीपेक्षा १६ कमी आहेत. यादीत ४३ रिअल इस्टेट विकासकांनी स्थान प्राप्त केले आहे. डीएलएफचे राजीव सिंह आणि त्यांचे कुटुंब ६१,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह रिअल इस्टेट विकासकांमध्ये अव्वल आहेत. ते भारतीय श्रीमंतांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत.

टॉप-१० श्रीमंतांच्या एकूण संपत्तीत ५९% वाटा अदानी आणि अंबानी यांचा आहे नाव संपत्ती वाढ/घट गौतम अदानी 10,94,400 +116% मुकेश अंबानी 7,94,700 +11% सायरस पूनावाला 2,05,400 +25% शिव नादर 1,85,800 -21% राधाकिशन दमानी 1,75,100 +13% विनोद शांतिलाल अदानी 1,69,000 +28% एसपी हिंदुजा 1,65,000 -25% एलएन मित्तल 1,51,800 -13% दिलीप सांघवी 1,33,500 +12% उदय कोटक 1,19,400 +3% (संपत्ती कोटी रुपयांत, वाढ/घट 2022 मध्ये आतापर्यंत)

149 new additions to country’s rich list 1103 Indians with assets above Rs 1000 crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात