पुणे जिल्ह्यात पवन मावळातील कुसगांव येथील धरणात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यात पवन मावळातील कुसगांव येथील धरणात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.विनय कडू (वय १७ वर्षे, रा. रावेत,पुणे) व आशिष गोगी (वय १७ वर्षे रा. सोमाटने,पुणे) अशी पाण्यात बुडून मयत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. १२th standarad two students lost his life in kusgaon dam
सध्या बारावीची परीक्षा सुरू असून मराठी विषया व्यतिरिक्त इतर सर्व विषयांचे पेपर झाले असून दरम्यानच्या काळात सुट्टी असल्याने पवन मावळातील कुसगांव येथील धरणात बारावीत शिकत असलेली सहा मुले फिरण्यासाठी आली होती. ही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली असताना त्यातील आकुर्डी येथील महाळसाकांत महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत असलेला विनय कडू (वय १७ वर्षे, रा. रावेत) व आशिष गोगी (वय १७ वर्षे रा. सोमाटने) या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शिरगाव -परंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या दोघांना बाहेर काढून उपचारा करिता सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात नेले मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App