विशेष प्रतिनिधी
नाशिक – नाशिक शहरात १२ मे ते २२ मे असा १० दिवसांचा क़डक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल दुकाने आणि हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने या १० दिवसांच्या कालावधीत बंद राहतील. 12 to 22 may 2021 total lockdown in nashik
नाशिकमध्ये लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
Lockdown Again: महाराष्ट्रातला लॉकडाऊन वाढणार का? ; डॉ. शशांक जोशी यांचे मत जाणून घ्या
त्यानुसार नाशिकमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन काळात शहरातील सर्व दुकाने बंद राहतील. हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची आज जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. निर्बंध असतानाही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कडक लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वैद्यकीय कारणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर फिरता येणार नाही. नागरिकांना किराणा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवा दुपारपर्यंतचा वेळ असेल. १२ मे रोजी दुपारी १२ पासून २२ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. ‘नाशिक बाजार’ या अॅपवरूनही नागरिकांना भाजीपाला, दूध, औषधे यांची खरेदी करता येईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App