प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यावेळचे हंगामी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केले आहे. हे निलंबन एका वर्षभरासाठी आहे.12 MLAs – 12 MPs suspended: Devendra Fadnavis says the exact difference
त्याच बरोबर राज्यसभेतील गैरवर्तनाबद्दल राज्यसभेच्या 12 सदस्यांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी एका अधिवेशन काळापुरते निलंबित केले आहे. यासंदर्भात नेमका फरक काय आहे?, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत तसेच ट्विट करून लक्षात आणून दिले आहे.
“राज्यसभेतील निलंबन आणि विधानसभेतील निलंबन यात मोठे अंतर. तेथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. प्रकरण समितीपुढे गेले, पुरावे गोळा केले गेले आणि नंतर निलंबन झाले, तेही एका अधिवेशनासाठी. याला लोकशाही म्हणतात. महाराष्ट्रात यापैकी काहीच झाले नाही, याला तानाशाही म्हणतात :” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाविकास आघाडीचे नेते आपल्याकडे 170 आमदारांचा आकडा आहे, असे सांगतात. परंतु तो आकडा किती पोकळ आहे हे त्यांच्या कृतीतूनच दिसते. बनावटगिरी करून भाजपचे 12 आमदार निलंबित करून ठाकरे – पवार सरकार आपले
बहुमत कसेबसे टिकवायचा प्रयत्न करत आहे आणि अध्यक्षपदाची निवडणूक नियमबाह्य पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App