एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजाेबा, वडील, अल्पवयीन भाऊ आणि चुलत मामा यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब शाळेतील समुपदेशक महिलेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर चाैघांजणां विराेधात बंडगार्डन पाेलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, पास्काेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजाेबा, वडील, अल्पवयीन भाऊ आणि चुलत मामा यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब शाळेतील समुपदेशक महिलेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर चाैघांजणां विराेधात बंडगार्डन पाेलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, पास्काेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 years old girl raped by four family members crime registered in police station
यासंर्दभात २९ वर्षीय समुपदेशक महिलेने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात आराेपीं विराेधात फिंर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलीसांनी मुलीचे ४५ वर्षीय वडील, १४ वर्षीय भाऊ, आजाेबा व चुलत मामा विराेधात गुन्हा दाकल केला आहे. सदर पिडित मुलगी ही काेराेगाव पार्क परिसरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत महिला समुपदेशकाच्या माध्यमातून विद्यार्थीनांना ‘गुड टच, बॅड टच’ याबाबतची माहिती समजवून सांगितले जात हाेते. त्यावेळी यासंर्दभात समुपदेशकांनी विश्वासात घेतल्यानंतर मुलीने मागील चार वर्षापासून तिच्यावर सुरु असलेल्या अत्याचाराची माहिती त्यांना दिली.
पिडित मुलीचे कुटुंबीय मुळचे बिहारचे रहिवासी असून बिहार मध्ये गावी गेले असताना २०१७ साली वडीलांनी घरात काेणी नसताना तिच्यावर जबरदस्ती करत शारिरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाेव्हेंबर २०२० मध्ये पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील राहते घरात तिच्या १४ वर्षीय भावाने तिच्या साेबत अनेक वेळा जबरदस्ती करत शारिरिक संबंध केले. त्यानंतर, जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजाेबानीही तिच्याशी छेडाछाड केली तर मे २०२१ तिच्या चुलत मामाने तिच्यासाेबत गैरवर्तन केले आहे. याबाबत बंडगार्डन पाेलीस ठाण्याच्या सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस.सपकाळे पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App