इम्रान खान यांच्या विरोधात महिला संघटना सरसावल्या, जाहीर माफीची मागणी

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद – स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचाराला तोकडे कपडे कारणीभूत ठरतात अशा आशयाचे विधान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मानवी हक्क आयोगासह १६ नागरी सामाजिक संस्थांनी केली आहे. Women organization demand resignation of Imran Khan

कराचीत विविध संस्थांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. वुमन्स अॅक्शन फोरम, तेहरीक-ए-निस्वान, औरत मार्च, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ लेबर एज्युकेशन अँड रिसर्च, आदी संस्थांचे प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित होते.



 

गेल्या दोन महिन्यांत इम्रान यांनी दोन वेळा असे वक्तव्य केले. त्याचे पाकिस्तानात तीव्र पडसाद उमटले आहेत. मानवी हक्क आयोगाच्या शाखेने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, बलात्कार कसे आणि का होतात याविषयी इम्रान यांचे मत आणि दृष्टिकोन अत्यंत चुकीचे आहे. पाकिस्तानात बलात्कार हा अत्यंत गंभीर आणि सर्रास घडणारा गुन्हा आहे. तो रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यातून मिळत नाही.

इम्रान यांच्या सत्ताधारी पक्षातील महिला सदस्यांनी त्यांच्या विधानाचे समर्थन करण्यासाठी या वादात उडी घेतली आहे. हे तितकेच निराशाजनक आहे. त्यांची वक्तव्ये अस्पष्ट आणि अतार्किक आहेत, असेही मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे.

Women organization demand resignation of Imran Khan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात