टाईट पँट घातली म्हणून महिला खासदाराला संसदेच्या बाहेर काढले, समाजाला काय दाखविता असा पुरुष खासदाराचा सवाल


अजब कपडे घातलेत, समाजाला काय दाखविताहेत म्हणत पुरुष आमदाराने केलेल्या टिपण्णीनंतर संसद अध्यक्षांनी चक्क एका महिला खासदाराच्या टाईट पँटवर आक्षेप घेतला. त्यांना भर संसदेतून बाहेर काढले. अफ्रिकेतील देश असलेल्या टांझानियात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संसदेच्या अध्यक्षाही महिलाच आहेत. Woman MP kicked out of Parliament for wearing tight pants


विशेष प्रतिनिधी

डोडोमा : अजब कपडे घातलेत, समाजाला काय दाखविताहेत म्हणत पुरुष आमदाराने केलेल्या टिपण्णीनंतर संसद अध्यक्षांनी चक्क एका महिला खासदाराच्या टाईट पॅँटवर आक्षेप घेतला. त्यांना भर संसदेतून बाहेर काढले. अफ्रिकेतील देश असलेल्या टांझानियात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संसदेच्या अध्यक्षाही महिलाच आहेत.

टांझानियातील महिला खासदार कॉनडेस्टर शिजवेल या संसदेच्या अधिवेशनासाठी आल्या होत्या. त्यांनी काळ्या रंगाची पॅँट आणि पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यांची पॅँट टाईट असल्याने एक पुरुष खासदार हुसैन अमर त्यांच्या कपड्यांकडे पाहून म्हणाले, आपल्या काही बहिणींनी अजबच कपडे परिधान केले आहेत. त्या समाजाला काय दाखवत आहेत. त्यांच्या या टिपण्णीवर संसदेच्या अध्यक्ष जॉब डुगाई म्हणाल्या जा आधी व्यवस्थित कपडे परिधान करा आणि मग संसदेत या.



शिजवेल यांच्या पॅँटकडे पाहत खासदार हुसैन अमर म्हणाले, संसदेत समाजाची विचारसरणी आणि त्याची झलक दिसत असते. संसदेत महिलांनी टाइट कपडे परिधान करून का येऊ नये, यासाठी संसदेचे नियम आहेत.

कॉनडेस्टर यांना अशा प्रकारे संसदेतून बाहेर काढल्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी आता महिला खासदारांनी केली आहे. महिला खासदाराला बाहेर काढल्यानंतर संसद अध्यक्ष म्हणाल्या, महिला खासदाराच्या कपड्यांसंदर्भात पहिल्यांदाच तक्रार आली, असे नाही. याच वेळी त्यांनी, कुणी व्यवस्थित कपडे परिधान केलेले नसतील, तर त्यांना संसदेत प्रवेश देऊ नये, असा आदेशही संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला आहे .

Woman MP kicked out of Parliament for wearing tight pants

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात