विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यामागे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत जमा झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने साप्ताहिक अहवालात नमूद केले आहे.WHO targets India on tackling corona
महिन्याभरापूर्वी भारतात निवडणूक प्रचार आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात फैलावण्यास मदत झाली. ‘बी.१.१.७’ या प्रकाराचा कोरोना विषाणू ब्रिटनमध्ये प्रथम आढळला आणि आता अमेरिकेत त्याचा प्रसार झाला आहे.
बी. १.६१७ हा जास्त धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण आनुवंशिक क्रमवारीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय कोरोना साथीच्या फैलावासाठी या अवताराला दोष देता येणार नाही, ‘डब्लूएचओ’च्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा ‘बी.१.६१७’ हा नवा अवतार प्रथम ऑक्टोबर २०२०मध्ये दिसून आला. याचे अनेक म्युटेशन आहेत. विषाणूच्या इतर प्रकारात हे म्युटेशन अधिक चिंताजनक असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोरोना अन्य प्रकाराच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांना अन्य म्युटंटचा सामना करणे कठीण होऊ शकते. लसीकरणानंतर तयार झालेली प्रतिपिंडे ‘बी.१.६१७’ वर फारशी परिणामकारक ठरत नसल्याचे अभ्यासाअंती आढळले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App