वृत्तसंस्था
बीजिंग : चीनने पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धनौका दिली आहे. त्यामुळे हिंद महासागर व अरबी समुद्रात चीनसह पाकिस्तानची लुडबुड वाढणार आहे. Warships from China to Pakistan; In the Indian Ocean, in the Arabian Sea, there will be an increase in China’s involvement with Pakistan
हिंद महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही युद्धनौका चायना स्टेट शिपबििल्डग कार्पोरेशन लि. या कंपनीने तयार केली आहे. शांघाय येथील कार्यक्रमात ती पाकिस्तानच्या नौदलाकडे दिली. तिचे नाव पीएनएस तुघ्रील, असे आहे. पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मोईन उल हक यांनी सांगितले की, पीएनएस तुघ्रील युद्धनौकेमुळे हिंद महासागरातील शक्ती समतोल साधला गेला आहे.
अशा चार युद्धनौका पाकिस्तानी नौदलासाठी तयार करण्यात येत आहेत. या युद्धनौकेत जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, पाण्यातून वरच्या भागात मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय टेहळणीतहीउपयोगाची आहे. या युद्धनौकेवर अतिप्रगत युद्धसामुग्री असून इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राची व्यवस्था आहे. चीनने निर्यात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व प्रगत युद्धनौका आहे.
चीनचे पाकिस्तानशी सुरक्षा संबंध मजबूत असून वेळोवेळी चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे व इतर सामुग्री पुरवली आहे.हिंद महासागरात दिजबौती येथे पहिला लष्करी तळ चीनने उभारला आहे. चीनने पाकिस्तानचे ग्वादर बंदर ताब्यात घेतले आहे ते अरबी समुद्रात असून चीनमधील शिनजियांग प्रांताला ते जोडते. चीन- पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्पात त्याचा समावेश आहे. चीनने श्रीलंकेतील हंबनतोटा बंदर ९९ वर्षांच्या कराराने घेतले आहे. त्यामुळेही चीनचे वर्चस्व तेथे वाढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App