विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेकडे आता पुरेसे सैन्यबळ आणि शस्त्रसाठा नसल्याने काबूल विमानतळाची सुरक्षा करण्याव्यतिरिक्त आणि अमेरिकी नागरिकांसह काही निवडक अफगाणींना देशाबाहेर काढण्याव्यतिरिक्त आम्ही फारसे काही करू शकत नाही, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेकडे मदत मागणाऱ्या सर्वांनाच मदत करण्यासाठी मोहिमेचा विस्तार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. USA declares they will keep eye on only airport
अमेरिकेचे सध्या साडे तीन हजार सैनिक काबूल विमानतळावर तैनात आहेत. अफगाणिस्तानात असलेल्या अमेरिकी नागरिकांना आणि अमेरिका सरकारला मदत केलेल्या अफगाणी नागरिकांना विमानातून अमेरिकेला नेले जात आहे. तालिबानी दहशतवादी सध्या तरी नागरिकांना विमानतळाकडे जाऊ देत आहेत.
याबाबत ऑस्टिन म्हणाले की,‘‘ सध्या सुरु असलेल्या मोहिमेचा विस्तार आम्ही करू शकत नाहीत. काबूलमध्ये पुरेशा प्रमाणात आमचे सैनिक नाहीत. त्यामुळे सध्या तरी विमानतळाच्या संरक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यावरच आम्ही भर देणार आहोत.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App