केंटकीमध्ये नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सना अपघात झाला.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेतील दोन अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर केंटकीमध्ये उड्डाण करत होते. यावेळी त्यांच्यात धडक झाल्याने आग लागली. या अपघातात ९ जवानांना जीव गमवावे लागला आहे. अमेरिकेच्या स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. Two American Blackhawk helicopters crash 9 soldiers lost their lives
पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला हिंसाचार; दोन गटात हाणामारी, अनेक वाहने जाळली
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकन सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, केंटकीमध्ये नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दोन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सना अपघात झाला. या अपघातात नऊ जवान शहीद झाले. फोर्ट कॅम्पबेल सार्वजनिक व्यवहार कार्यालयाने सांगितले की, चालक दलाचे सदस्य १०१ व्या एअरबोर्न डिव्हिजनद्वारे संचालित दोन HH-60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर उडवत होते. केंटकीच्या ट्रिग काउंटीमध्ये बुधवारी रात्री उशिरा दुर्घटना घडली.
१३८१ मैलांपर्यंत ब्लॅक हॉकची रेंज –
ब्लॅक हॉकची रेंज १ हजार ३८१ मैलांपर्यंत आहे. एकदा इंधन भरले की ते शेकडो किमीपर्यंत उड्डाण करू शकतात. त्यांची भार उचलण्याची क्षमताही चांगली असल्याचे सांगितले जाते. यूएस लष्कराचा दावा आहे की त्याच्या बाह्य मालवाहू हुकसह, ब्लॅकहॉक तब्बल ८ हजार पौंड वजन उचलू शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App