विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घडलेल्या प्रकारात एका टिकटॉकर महिलेला एका जमावाने जबर मारहाण केली. तिचे कपडे फाडून अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीसांनी शंभरावर जणांवर गुन्हा दाखल केला आहे.Tiktokar woman beaten by people on Pakistan’s Independence Day, hundreds charged
1ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शहरातील ग्रेटर इक्बाल पार्क येथे महिला टिकटॉकर आणि तिच्या साथीदारांकडून मारहाण आणि चोरी केल्याप्रकरणी लाहोर पोलिसांनी शेकडो अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला तिच्या सहा साथीदारांसह स्वातंत्र्यदिनी मीनार-ए-पाकिस्तानजवळ एक व्हिडिओ चित्रित करत होती जेव्हा सुमारे 300 ते 400 लोकांनी तिच्यावर हल्ला केला. या महिलने सांगितले की तिने आणि तिच्या साथीदारांनी गदीर्तून सुटण्यासाठी खूप प्रयत्न केले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पार्कच्या सुरक्षारक्षकाने मिनार-ए-पाकिस्तानच्या जवळचे प्रवेशद्वार उघडले.
मात्र, तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. लोकांनी या महिलेला मारहाण करत कपडे फाडले. काही लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावापुढे त्यांचे काहीही चालले नाही. गर्दीने उचलून या महिलेला खालीही फेकून दिले. या महिलेच्या साथीदारांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील ऐवज लुटण्यात आला.
याप्रकरणी पोलीसांनी कलम 354 अ (महिलेवर प्राणघातक हल्ला, कपडे फाडणे), 382 (चोरी घ्), 147 (दंगल) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागला आणि नागरिकांनी व्हिडिओमधील पुरुषांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला.
पाकिस्तानात एका महिलेची बलात्कार करून हत्या झाल्यावर महिलांवरील हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकताच एक एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये इस्लामाबादमध्ये सहा पुरुष एका जोडप्याला त्रास देताना दिसत आहेत. पुरुषांनी त्या जोडप्याला बंदुकीच्या धाकावर मारहाण केली. अश्लिल शिवीगाळ केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App