विशेष प्रतिनिधी
टोकियो: जपानच्या उत्तर किनाऱ्यावर तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे दोन तुकडे झाले. जहाजातून तेलाची गळतीही सुरू होती. मात्र, २१ कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. हे जहाज पनामीयन आहे.The 39,910-ton ship was wrecked in two pieces,21 crew members survived
हे जहाज जपानच्या उत्तरेकडील बंदराकडे निघाले होते. मात्र, अचानक त्याचे दोन तुकडे झाले. त्यातून तेलाची गळतीही सुरू होती. मात्र, गळतीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि जहाजाला किनाऱ्यावर पोहोचविण्यात आले असे जपान तटरक्षक दलाने सांगितले.
सुएझ कालव्यात ऐतिहासिक ‘ट्रॅफिक जॅम’ करणार महाकाय जहाज अखेर लागले किनाऱ्याला
३९,८१९ टन वजनाचे क्रिमसन पोलारिस नावाचे हे जहाज लाकडी चिप्स घेऊन जात होते. हाजीनोहे बंदराकडे निघाले होे. मात्र, खराब हवामानामुळे जहाजाला बंदरात जाणे शक्य नाही. त्यामुळे किनाºयापासून चार किलोमीटर अंतरावर जहाजाचा नांगर टाकण्यात आला. त्याचवेळी या जहाजाचे दोन तुकडे झाले.यापूर्वीही मॉरीशसच्या समुद्रात अडकलेले जपानी जहाज दोन भागात तुटले आहे. मालवाहक जपानी जहाज एमवी वाकाशियो मॉरिशसमध्ये एका खडकाला धडक दिल्याने अडकले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App