हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी त्याचे थेट प्रदर्शन देशभरात केले जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग आज प्रसारित होणार आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी त्याचे थेट प्रदर्शन देशभरात केले जाणार आहे. The 100th episode of Prime Minister Modis Mann Ki Baat will be broadcast live today at the UN headquarters
संयुक्त राष्ट्रातील भारतीय स्थायी मिशनने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मन की बात ही राष्ट्रीय परंपरा आहे, जी लाखो लोकांना भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी प्रेरित करते. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता सुरू होईल. मात्र, या वेळी न्यूयॉर्कमध्ये रात्रीचे दीड वाजले असतील. ऑल इंडिया रेडिओसह विविध प्लॅटफॉर्मवर ते ऐकता येते.
मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग ऐकण्यासाठी भाजपाने विशेष तयारी केली आहे. दिल्लीत 6530 ठिकाणी तो ऐकला जाईल. महाराष्ट्रातही मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील तब्बल पाच हजारांहून अधिक ठिकाणी “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एवढच नाही तर या मन की बात कार्यक्रमाच्या शतकाबद्दल थेट बिल गेट्स यांनीही पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपाने सांगितले की देशभरात सुमारे चार लाख ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. जेणेकरून लोक पंतप्रधानांचे भाषण ऐकू शकतील, पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा याला ऐतिहासिक आणि यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तयारीचे निरीक्षण करतील.
‘मन की बात @ 100’ कार्यक्रमादरम्यान एक स्मरणार्थ टपाल तिकीट आणि एक नाणेही प्रसिद्ध करण्यात आले. आगामी कार्यक्रमाबद्दलचा उत्साह शेअर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाच्या १००व्या भागाची “आतुरतेने वाट पाहत आहेत”.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App