विशेष प्रतिनिधी
फिलाडेल्फिया : टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक कार मधील पहिल्या सीटवर जन्मलेल्या एका बाळाला सध्या सर्वत्र टेस्ला बेबी म्हणून ओळखले जात आहे. फिलाडेल्फिया (अमेरिका) मध्ये ही घटना घडली. यिराना आणि कीटिंग शेरी हे या बाळाचे पालक आहेत. यिराना आणि कीटिंग यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. कीटिंग जो यिरानाचा नवरा आहे, तो जेव्हा आपल्या तीन वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी तयार होत होता. त्यावेळी अचानक यिरानाला प्रसूती वेदना सुरू झाल्या.
Tesla Baby: Woman gives birth to baby in electric car!
अशावेळी काय करायचे हे न कळल्यामुळे, त्या दोघांनी आपल्या इलेक्ट्रिक कारमध्ये हॉस्पिटलचा पत्ता टाकून जीपीएस ऑन करून गाडी ऑटोपायलट मोडवर ठेवली. पण तिच्या इतक्या वेदना वाढल्या की तीने गाडीतच मुलीला जन्म दिला. या मुलीला आता सर्वत्र टेस्ला बेबी म्हणून ओळखले जाते.
Tesla Cars India : टेस्लाने भारतात कारचे उत्पादन केले, तर आम्ही मदतच करू! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
त्यांच्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी 20 मिनिटे लागणार होते. जन्मलेले बाळ अतिशय हेल्दी आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर्सनी बाहेर येऊन नाळ कापली..हॉस्पिटल मधील नर्सेसनी त्या बाळाला टेस्ला बेबी म्हणण्यास सुरुवात केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App