चीनच्या नादी लागलेल्या नेपाळमध्ये भयंकर परिस्थिती, ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू, भारताकडे मदतीचे साकडे


नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून दररोज शेकडो नागरिकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे.   नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा प्रचंड तुडवडा आहे.  Terrible situation in Nepal, hundreds die every day due to lack of oxygen, appeal तो India for help


विशेष प्रतिनिधी

काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या नादी लागले आहेत. चीनने येथे गुंतवणूकही केली आहे. मात्र, कठीण प्रसंगी चीन मदतीला आला नाही. नेपाळमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून दररोज शेकडो नागरिकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे.

नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा प्रचंड तुडवडा आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे.

चीनने गेल्या काही वर्षांपासून नेपाळला आपल्या मदतीच्या ओझ्याखाली दाबून टाकले आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीनच्या नेपाळमधील राजदूतच जणू सरकार चालवित असल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नेपाळला चीनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडे मदतीचे साकडे घातलेआहे.नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. भारताने त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन , आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा. कोरोनापासून बचावासाठी लागणारं सर्वात मोठे शस्त्र म्हणजेच लिक्विट ऑक्सिजन त्यांच्याकडे नाही. नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवड्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी दसपटीने वाढली असून, आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत असल्याचे भट्टाराय यांनी म्हटले आहे.

भारताकडूनही काही प्रमाणात मदत केली जात आहे. सीरमच्या कोव्हिशिल्डचे १० लाख कोरोना लसींचे डोस नेपाळला देण्यात आले आहेत. नेपाळमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. नेपाळमध्ये दररोज ८ हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर येत असून, १५० ते २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

Terrible situation in Nepal, hundreds die every day due to lack of oxygen, appeal तो India for help

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती