पाकिस्तानच्या दबावामुळे तालिबान्यांनी विमानतळाबाहेर भारतीयांना रोखले कागदपत्रांवरून घेतली झडाझडती

विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केला जात असताना तालिबानी मात्र त्यात वारंवार अडथळे आणत आहेत. काल दिडशे भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.Taliban takes on Indians on airport

काबूल विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या या भारतीय नागरिकांना दस्तावेजांच्या कारणावरून तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते. या आडकाठी मागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.



तालिबान्यांनी ज्या नागरिकांना विमानतळाबाहेर रोखले त्यात ७० हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश होता. अफगाणी नागरिक असल्याचे सांगत त्यांना विमानतळावर जाण्यास मज्जाव करण्यात आला.
भारताने याआधी दोनशे लोकांची सुटका केली असून त्यात राजदूत आणि अन्य राजनैतिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात चाळीसजणांना मायदेशी आणण्यात आले होते त्यात प्रामुख्याने राजनैतिक कर्मचाऱ्यांचाच समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात ‘सी-१७ ’या विमानाच्या माध्यमातून दीडशे भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. आणखी काही नागरिक अफगाणिस्तानातच अडकल्याचे बोलले जाते.

Taliban takes on Indians on airport

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात