विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी अफगाणिस्तानवरील आक्रमण त्वरित थांबविण्याचे आवाहन त्यांनी तालिबानला केले.Taliban must follow rules says , UN secretary
‘‘अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. एका देश ज्याला दुर्दैवाने पिढ्यानपिढ्या केवळ संघर्षामुळे ओळखले जाते, तो देश पुन्हा एका अराजकतेचा सामना करीत आहे, ही त्या देशातील सहनशील लोकांसाठी एक अविश्वसनीय आणि दुर्दैवी शोकांतिका आहे,’’ असे गुटेरेस म्हणाले.
आक्रमण त्वरित थांबवण्याचे आणि अफगाणिस्तानमधील लोकांच्या हितासाठी एकमेकांवर विश्वास ठेवून वाटाघाटी करण्याचे आवाहन त्यांनी तालिबानला केले. निष्पाप नागरिकांवर हल्ले करणे हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे उल्लंघन आहे आणि तो युद्धजन्य गुन्हा आहे. यासाठी अपराध्यांना जबाबदार धरायला हवे, असे ते म्हणाले.
‘‘अफगाणी मुली आणि स्त्रियांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जात आहेत. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार लोकांना नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातून पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App