काबूलच्या रस्त्यावर तालिबानची ‘बुरखा ब्रिगेड’, महिलांच्या विरोधात महिलांचाच काढला मोर्चा


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून दररोज महिलांविरोधात काही फर्मान जारी केले जात आहेत. महिलांनी विरोध केला तेव्हा तो विरोध चिरडण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या. महिलांना चाबकाचे फटके मारण्यात आले आणि आता तालिबान्यांनी महिलांना गुलामगिरीच्या साखळदंडात अडकवण्याची नवी पद्धत अवलंबली आहे. काबूलच्या रस्त्यावर बुरखा ब्रिगेड उतरवण्यात आली आहे.taliban conspiracy of woman vs woman women burka brigade on streets of kabul

तालिबान महिलांचा आवाज दडपू शकला नाही, म्हणून शेवटी काबूलच्या रस्त्यावर त्यांची बुरखा ब्रिगेड उतरवली आहे. या तालिबानी बुरखा ब्रिगेडच्या परेडचा हेतू काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या बॅनरवर एक नजर टाका. याचा अर्थ… आम्ही मुजाहिदीनच्या वृत्ती आणि वागण्यावर समाधानी आहोत.



image.png

बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या हातात बॅनर

पश्तो भाषिक देशात हे बॅनर इंग्रजीत छापले गेले आणि बुरखा घातलेल्या महिलांना हा संदेश दिला गेला की, इतर देशांना संदेश द्या की अफगाणिस्तानात महिलांवर अत्याचार होत नाहीत. पण या परेडमध्ये हा बनावट अजेंडा उघड झाला. सशस्त्र तालिबानची छायाचित्रेही कॅमेऱ्यात कैद झाली. जर महिला खरोखरच तालिबानी राजवटीवर समाधानी आणि आनंदी असत्या, तर त्यांनी बंदुकीच्या जोरावर परेड केली नसती.

अफगाण स्त्रिया तालिबानच्या फर्मानांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. शिक्षण, खेळ आणि त्यांच्या मोकळ्या वातावरणात श्वास घेण्याच्या अधिकाराची मागणी करत त्या तालिबानच्या मानसिकतेला थेट आव्हान देत आहेत. हा विरोध संपूर्ण अफगाणिस्तानात पसरू नये म्हणून म्हणून तालिबान्यांनी आता परेडची टूम काढली आहे.

अफगाणिस्तानातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा संयुक्त राष्ट्रातही उपस्थित झाला, त्यानंतर तालिबानची भूमिका थोडी नरम झाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी तालिबानच्या वतीने असे म्हटले होते की, ते महिलांच्या हक्क हिरावणार नाहीत. पण सत्य हे आहे की, त्यांनी सत्ता हाती घेताच प्रथम महिलांचेच स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम केले आहे

taliban conspiracy of woman vs woman women burka brigade on streets of kabul

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात