पीसीबीचे प्रमुख रमीझ राजा यांनी आपल्याच क्रिकेट बोर्डाची केली पोलखोल, म्हणाले – पाकिस्तानमध्ये क्रिकेट बीसीसीआयच्या मेहेरबानीवर सुरू आहे!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पीसीबीचे प्रमुख रमीज राजा यांनी टी -20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, जर पाकिस्तानने विश्वचषकात भारताला हरवले तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला कोरा धनादेश मिळेल. पीसीबी प्रमुखांच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी 90 टक्के निधी भारताकडून येतो. हा एक योगायोग म्हणता येईल की, आजपर्यंत पाकिस्तान भारताला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये वर्ल्डकपमध्ये हरवू शकलेला नाही. राजकीय संबंधांमधील दुराव्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळल्या जात नाहीत. हे दोन संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा आशियाई स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात. T-20 World Cup 2021 Rameez Raja Said Cricket in Pakistan is Because Of BCCI

गुंतवणूकदाराने दिली माहिती

पीसीबी चेअरमन म्हणाले की, सीनेटच्या स्थायी समितीच्या आंतर-प्रांतीय समन्वय समितीच्या बैठकीत एका गुंतवणूकदाराने मला सांगितले आहे की, जर पाकिस्तानचा संघ टी -20 विश्वचषकात भारताला हरवले, तर त्यासाठी एक कोरा चेक तयार करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अलीकडेच, न्यूझीलंड संघ दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी आला होता परंतु सुरक्षेच्या कारणास्तव परतला. यानंतर इंग्लंड संघानेही पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.

इतर संघ आपल्याला कचरा समजतात

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पुढे म्हणाले, जर आमची आर्थिक स्थिती मजबूत असती, तर इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी आमचा वापर करून डस्टबिनमध्ये टाकले नसते. ते म्हणाले की, सर्वोत्तम संघ आणि सर्वोत्तम क्रिकेट अर्थव्यवस्था ही दोन मोठी आव्हाने आहेत. जोपर्यंत टी -20 क्रिकेट विश्वचषकाचा प्रश्न आहे, भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळलेला विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2014 मध्ये टीम इंडिया टी -20 वर्ल्डमध्ये उपविजेता ठरली. त्याच वेळी, 2021 क्रिकेट विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ज्याचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

T-20 World Cup 2021 Rameez Raja Said Cricket in Pakistan is Because Of BCCI

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”