वृत्तसंस्था
मॉस्को : युक्रेनमधून सात लाख लोकांनी पलायन केले असून रशियन सैन्याने सीमेवर शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच अण्वस्त्राचा धाक दाखविण्यास सुरुवात केली आहे. Seven million people flee Ukraine; Demonstrations of Russian troops on the border; Fear of nuclear weapons
युक्रेनमध्ये आता बॉम्बहल्ल्यांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. डोनेस्टक व लुहांस्क प्रांतात रशियन समर्थक फुटीरवादी गटांनी युद्धसदृश स्थिती निर्माण केली आहे. त्यांनी २४ लष्करी चौक्यांवर हल्लेही चढविले आहेत. युक्रेनच्या सैनिकाचा मृत्यू झाला.परिसरातील सुमारे सात लाखांवर लोकांनी पलायन केले आहे. फुटीरवाद्यांनी सर्व माजी सैनिकांची भरती सुरू केली आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला.
बायडेन म्हणाले, रशियाने किव्हमधील २८ लाख निर्दोष लोकांचे प्राण संकटात टाकले आहेत. पुतीन यांनी हल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस म्युनिचमध्ये म्हणाल्या, रशियाच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यातच शनिवारी रशियाने सरहद्दीवर शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी या भागाला भेट देऊन वॉरगेम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App