US School Shooting : अमेरिकेतील शाळेत गोळीबार, तीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू

पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर तरूण मुलगी ठार

विशेष प्रतिनिधी

 नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन विद्यार्थ्यांसह  मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी गोळीबार करताना २०० मुले ख्रिश्चन शाळेत शिकतात. विशेष म्हणजे गोळीबार एका तरूण मुलीने केले आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. Seven dead including three students in US school shooting

या घटनेत अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. गोळीबाराची ही घटना अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशविले येथील ख्रिश्चन शाळेत घडली आहे. पोलिसांनी हल्लेखोर तरुणीला ठार केले आहे. गोळीबारानंतर मुलांचे मृतदेह स्थानिक वँडरबिल्टच्या मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयाचे प्रवक्ते जॉन हाऊसर यांनी सांगितले की, तिन्ही मुले रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याशिवाय आणखी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना घडलेल्या शाळेत एकूण २०० मुले शिकतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुणी बाजूच्या दरवाजातून इमारतीत घुसली होती. गोळीबार केल्यानंतर ती शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली होती. येथेच ती पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारली गेली.

Seven dead including three students in US school shooting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात