युक्रेन युद्धाला 51 दिवस उलटून गेले असून युद्ध संपण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. दरम्यान, रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने युक्रेन युद्धात रशियन युद्धनौका बुडणे म्हणजे तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, युक्रेनच्या हल्ल्यात ही युद्धनौका बुडाली नसून तांत्रिक बिघाडामुळे आग लागली, असेही याच वाहिनीने स्पष्ट केले.Russia Ukraine War: Russia’s state TV says – World War III has begun; Destroys Ukrainian military base in Kiev
वृत्तसंस्था
मॉस्को/कीव्ह : युक्रेन युद्धाला 51 दिवस उलटून गेले असून युद्ध संपण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. दरम्यान, रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने युक्रेन युद्धात रशियन युद्धनौका बुडणे म्हणजे तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, युक्रेनच्या हल्ल्यात ही युद्धनौका बुडाली नसून तांत्रिक बिघाडामुळे आग लागली, असेही याच वाहिनीने स्पष्ट केले.
रशियन टीव्हीने काय म्हटले?
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनमध्ये लष्करी कारवाईदरम्यान नुकसान झाल्यानंतर मस्कवा ही युद्धनौका काळ्या समुद्रात बुडाली. त्यावरून क्षेपणास्त्रे डागली जात होती.
ही युद्धनौका बुडवल्यानंतर युक्रेनने ही युद्धनौका बुडवल्याचा दावा केला होता. या दाव्यावर रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनल रशिया-1 ची प्रेझेंटर ओल्गा करबायेवा यांनी त्यांच्या कार्यक्रमात सांगितले की, युक्रेनचा दावा खरा मानला तर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे असे म्हणता येईल. आम्ही नाटोविरुद्ध लढत आहोत. मुस्कावावरील हल्ला हा थेट रशियावर केलेला हल्ला आहे. बुडणाऱ्या मस्कावा या युद्धनौकेमध्ये अण्वस्त्रेही होती, असा दावा काही माध्यमांनी केला आहे.
मारियुपोल रशियाच्या ताब्यात?
रशियन सैन्याने युक्रेनमधील मारियुपोल शहर ताब्यात घेण्याच्या अगदी जवळ दिसत आहे. असे झाल्यास रशिया क्रिमियाचा रस्ता ताब्यात घेईल. रशिया डॉनबासमध्ये आपल्या सैन्याची संख्या वाढवत आहे, त्यानंतर येथे मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या सर्व भागात एकाच वेळी हवाई हल्ल्याचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. कीव्ह इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार राजधानी कीव्हमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. एकापाठोपाठ एक 3 स्फोट झाले आहेत. त्याचवेळी रशियाने अशी धमकी दिली आहे की, जर युद्ध लांबले तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App