मुघलांनी राजपुतांचा नरसंहार केला तसाच नरसंहार रशिया युक्रेनमध्ये करतोय, हे थांबवा!! युक्रेनच्या राजदूतांचे पंतप्रधान मोदींना आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याची तुलना मुघलांनी भारतावर केलेल्या आक्रमणाची करत मुघलांनी जसे भारतात रजपुतांचे शिरकाण केले. नरसंहार केला, तसाच नरसंहार रशियन फौजा युक्रेनमध्ये करत आहेत… हे थांबवा, असे भावनिक आवाहन युक्रेनची राजधानी राजदूत डॉक्टर इगोर पोलिख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.Russia is carrying out genocide in Ukraine just as the Mughals did

युक्रेनमधील खार्किव येथे रशियाने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ इगोर पोलिखा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाला भेट दिली.

युक्रेनवरील हल्ले थांबवण्यासाठी डॉक्टर इग्नोर पोलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. युक्रेनचे राजदूत म्हणाले, की रशियाचे युक्रेनवरील हल्ले हे मुघलांनी भारतात केलेल्या आक्रमणासारखेच आहेत. मुघलांनी जसा राजपुतांचा नरसंहार घडवला तसाच नरसंहार रशियन फौजा युक्रेनमध्ये करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह सर्व प्रभावशाली जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन पुतिन यांच्या युद्धखोरीला आळा घालावा.

युक्रेनमधील खार्किव येथे रशियाने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. इगोर पोलिख यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
भारताकडून युक्रेनला मानवतावादी मदत देण्याबाबत चर्चा केली. मला परराष्ट्र सचिवांनी आश्वासन दिले की युक्रेनला जास्तीत जास्त मानवतावादी मदत मिळेल. भारत युक्रेन ला मदत करत आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असेही डॉ. पोलिख म्हणाले.

Russia is carrying out genocide in Ukraine just as the Mughals did

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण