वृत्तसंस्था
मॉस्को : रशियाने मैत्री नसलेल्या राष्ट्रांची एक यादी जाहीर करून नवा वाद निर्माण केला असून या यादीमुळे स्वतःच्या अनेक मित्रांना त्यांनी डिवचले आहे. कारण रशियाचे मित्र असलेल्या भारतासारख्या अनेक राष्ट्रांचे रशियाच्या शत्रू म्हणून जाहीर केलेल्या राष्ट्रांशी चांगले संबध आहेत.Russia announces list of hostile nations; President Putin’s response to economic sanctions
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका युरोपसह अन्य देशांनी कडक बंधने घातली आहेत. रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला आता रशियाने चोख उत्तर या यादीच्या माध्यमातून दिले आहे. आता रशियानेही एक विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये ज्या देशांशी किंवा संस्थांशी रशियाचे मित्रत्वाचे संबंध नाहीत,
त्यांची यादी तयार केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ज्या देशांनी रशियाविरोधात निर्बंध घातले असे देश यादीत आहेत. मित्र नसलेल्या विदेशी संस्थांबरोबर रशियन नागरिकांना किंवा कंपन्यांना काम करायचे असेल तर विशेष परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
यासंबंधीचा अध्यक्षीय आदेश सोमवारी प्रसिद्घ झाला आहे. अशा देशांमधील कर्जपुरवठादारांकडून विदेशी चलनात घेतलेल्या कर्जाची परतफेड रशियाचे चलन रुबल्समध्ये करण्याची मंजुरी या अध्यादेशानुसार देण्यात आली आहे. याचा लाभ रशियाचे सरकार, कंपन्या व नागरिकांना मिळणार आहे.
रशियाने जाहीर केलेली शत्रू राष्ट्रांची यादी
अमेरिका, कॅनडा, युरोपिय समुदाय, ब्रिटन, युक्रेन, मोन्टेनेग्रो, स्वित्झर्लंड, अल्बानिया, एंडोरा, आइसलँड, लिकटेन्स्टाइन, मोनॅको, नॉर्वे, सॅन मॅरिनो, उत्तर मॅसेडोनिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मायक्रोनेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि तैवान यांचा समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App