Rocket Attack On Afghanistan’s Kandahar Airport : अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. त्यातील दोन धावपट्टीवर पडले आणि स्फोट झाला. विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, धावपट्टी पुन्हा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. हे काम रविवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. Rocket Attack On Afghanistan’s Kandahar Airport, Three missiles Launched, No Casualties
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. त्यातील दोन धावपट्टीवर पडले आणि स्फोट झाला. विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तून यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, धावपट्टी पुन्हा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. हे काम रविवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
शनिवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्ल्यानंतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे मानले जात आहे, कारण हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा तालिबान दहशतवाद्यांनी हेरात, लष्कर गाह आणि कंधारला चारही बाजूंनी घेरले आहे. सध्या त्यांचे अफगाण सुरक्षा दलांसोबतचे युद्ध कंधारमध्ये सुरू आहे.
कंधार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे. येथील विमानतळाचा वापर अफगाण सैन्याला शस्त्रे आणि रसद पाठवण्यासाठी केला जातो. म्हणूनच तालिबानला या विमानतळावर कब्जा करून अफगाण सैन्याला मदत थांबवायची आहे. गेल्या 2-3 आठवड्यांत तालिबानने या भागात हल्ले वाढवले आहेत.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण सुरक्षा दलांनी अमेरिकेच्या मदतीने तालिबानच्या ताब्यात असलेली अनेक गावे रिकामी केली आहेत. सैन्याच्या कारवाईनंतर हे स्पष्ट झाले आहे की, तालिबानच्या हिंसाचारात पाकिस्तानी लढाऊदेखील तितकेच सहभागी आहेत. चकमकीदरम्यान, अशा अनेक सैनिकांना अफगाण सैन्याने ठार केले आहे, जे पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तानी ओळखपत्रेही सापडली आहेत.
तालिबानी दहशतवादी येथे दाखल झाले आहेत आणि सुरक्षा दलांशी सतत युद्ध करत आहेत. युद्धामुळे कंधारमधून आतापर्यंत हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या लोकांनी पाकिस्तान आणि इराणसारख्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या दबदब्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानी संघटना करत आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना पुन्हा भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी तैनात करतील. आशियाई घडामोडींवर वृत्त देणाऱ्या एशियनिस्ट या फ्रेंच वृत्तपत्राच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ही रिपोर्ट ऑलिव्हियर गिलार्ड यांनी तयार केला आहे.
Rocket Attack On Afghanistan’s Kandahar Airport, Three missiles Launched, No Casualties
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App