निवडणुकीत २१४ संसद सदस्य आणि ३५२ प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळवली
प्रतिनिधी
नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी देशाच्या तिसऱ्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. पौडेल हे नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन (माओवादी सेंटर) यांच्यासह आठ पक्षांच्या युतीचे उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीत २१४ संसद सदस्य आणि ३५२ प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळवली. पौडेल हे नेपाळच्या संसदेत १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.Ram Chandra Paudel elected new Nepal president
नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा यांनी ट्विट करून पौडेल यांचे अभिनंदन केले. ‘’माझे मित्र रामचंद्र पौडेल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.’’ असं त्यांनी म्हटलं आहे. पौडेल यांनी त्यांचा प्रतिस्पर्धी नेपाळ कम्युनिस्ट पार्टी यूएमएलच्या सुवास नेमबांग यांचा पराभव केला आणि ते देशाचे तिसरे राष्ट्रपती बनले.
‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा
पौडेल हे सोमवारी नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. नेपाळमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण ८८२ मतदार आहेत, ज्यात संसदेचे ३३२ सदस्य आणि सात प्रांतांच्या प्रांतीय विधानसभेचे ५५० सदस्य आहेत. निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शालिग्राम यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ५१८ प्रांतीय असेंब्ली सदस्य आणि ३१३ संसद सदस्यांनी मतदान केले होते. २००८ मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर नेपाळमधील ही तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती.
Ram Chandra Paudel elected new Nepal president Read @ANI Story | https://t.co/h5VpSicEQ1#Nepal #RamChandraPaudel pic.twitter.com/rzi8eBlDtE — ANI Digital (@ani_digital) March 9, 2023
Ram Chandra Paudel elected new Nepal president
Read @ANI Story | https://t.co/h5VpSicEQ1#Nepal #RamChandraPaudel pic.twitter.com/rzi8eBlDtE
— ANI Digital (@ani_digital) March 9, 2023
काही राजकीय पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता तर काहीजण विविध कारणांमुळे गैरहजर होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे उमेदवार रामचंद्र पौडेल यांना ३३,८०२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सुवास नेमबांग यांना १५,५१८ मते मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ८८४ मतदारांपैकी ८३१ खासदार आणि आमदारांनी मतदान केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App