श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादात आंदोलकांना सापडले रोख दीड कोटी रुपये!!; जनतेची रक्कम जनतेला परत!!


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली आहे. मात्र या रकमेची लूट न करता आंदोलकांनी ही रक्कम तिथल्या सुरक्षारक्षकांच्या हवाली केली आहे. जनतेचे लुटलेले पैसे जनतेला परत मिळाले, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत. Protesters find Rs 1.5 crore in cash at Sri Lankan president’s palace

श्रीलंकेत सध्या सरकार अस्तित्वात नाही देशात संपूर्ण अराजक पसरले आहे. महागाईने आणि टंचाईने जनता होरपळली आहे. त्यामुळे सगळी जनता रस्त्यावर उतरली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रसादात प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी तिथल्या विविध खोल्यांचा ताबा घेतला. तिथल्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेतला. जनतेला वीज टंचाईचा सामना करायला लागतो. पण राजेप्रसादातले एसी चालू होते. काही लोकांनी ते एसी फोडून टाकले. त्याचवेळी एका दालनामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली. ही रक्कम त्यांनी न लुटता तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या हवाली केली आहे.

दरम्यान काल रात्री पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर देखील आंदोलकांचा संताप शांत झाला नाही. त्यांनी राजीव विक्रम शिंदे यांचे निवासस्थान पेटवून दिले होते.

दिवाळखोर घोषित झालेल्या श्रीलंकेत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशात सर्वपक्षीय सरकारने सत्ता स्थापन करावी, असे आवाहन केले आहे. काल रात्री आंदोलकांनी त्यांचे निवासस्थान जाळले.

श्रीलंकेची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली असून जनतेचा उद्रेक झाला आहे. गेल्याच महिन्यात तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळणाऱ्या जनतेने राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे सरकारी निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” ताब्यात घेतले आहे. गोटाबाय राजपक्षे यांनी श्रीलंका सोडून पोबरा केला आहे.

श्रीलंकेत सध्या सरकार नावाचा घटक अस्तित्वात नाही. त्यातच आता पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष तात्पुरते राष्ट्राध्यक्ष होतील आणि ते देशात सर्वपक्षीय सरकार स्थापन करतील, असे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भातले तपशील अधिकृतरित्या कोणीच सांगितले नाहीत.

एकीकडे प्रचंड महागाई प्रचंड टंचाई आणि आर्थिक संकट तर दुसरीकडे आता पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यामुळे उभे राहिलेले राजकीय संकट याच्या खाईत श्रीलंका सापडली आहे.

Protesters find Rs 1.5 crore in cash at Sri Lankan president’s palace

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात