UN चे अध्यक्ष अब्दूल्ला शाहिद यांनी घेतले भारतातील कोविशिल्डचे दोन डोस!


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UN) ७६ व्या सत्राचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड या लसीचे दोन डोस घेतले.

President of UN general Assembly got Covishield from India

पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी  कोविशिल्ड या ब्रिटिश – स्विडीश औषध कंपनीने विकसित केलेल्या वॅक्सिनची निर्मिती करीत आहे.

शाहीद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मला लसीकरणाबाबत विचारला गेलेला हा प्रश्न तांत्रिक आहे. मी भारतात बनलेल्या व्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. किती देशांना कोविशिल्ड मान्य आहे हे मला माहीत नाही. परंतु जगातील बऱ्याच देशांना कोविशिल्ड मिळाली आहे.


Covishield vaccine : भारताच्या दबावासमोर ब्रिटन झुकला;कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी;यूकेचीे नवीन प्रवास नियमावली


त्यांना असा प्रश्न विचारला होता की, कोविड १९ साठीच्या लसींना (व्हॅक्सिन) मान्यता आवश्यक आहे का? व त्यावर विचार केला पाहिजे का? विश्व आरोग्य संघटनेने अथवा इतर संस्थेच्या मान्य केलेल्या व्हॅक्सिनचाच वापर केला पाहिजे का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर दिले की, “मी अजून जिवंत आहे. आणि मला असे वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तीने याच्यावर निर्णय घेतला पाहिजे मी यावर निर्णय घेऊ शकत नाही.” भारताने आत्तापर्यंत १०० देशांना ६.६ कोटी इतक्या व्हॅक्सिनची निर्यात केली आहे.

शाहिद यांचा देश म्हणजेच मालदीव हा भारतातील निर्मित व्हॅक्सिन मिळवणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक आहे. कोविशिल्डचे १ लाख डोस मालदीवला पाठवण्यात आले होते. ब्रिटनने सुरुवातीला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारा निर्मित झालेल्या कोविशिल्डला मान्यता दिली नव्हती. परंतु या निर्णयावर भारताकडून झालेल्या टिकेनंतर २२ सप्टेंबर रोजी आपल्या निर्णयात बदल करून या व्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.

President of UN general Assembly got Covishield from India

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात