विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:भारतात कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीत जागतिक महासत्ता भारताच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी फोन वर संभाषण झाले.तत्पूर्वी जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांनीही मोदींशी फोनवर चर्चा केली. President Biden phones PM Modi to discuss Covid; US jolted into action after criticism of silence over India’s plight
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये सोमवारी रात्री उशीरा बातचित झाल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये आपापल्या देशांमधील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा झाली. मोदींनी सांगितले की, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत कोरोना संकटाबाबत चर्चा झाली. या संकटात भारताला साथ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये कोरोना लस, औषध आणि आरोग्य साधनांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान जो बायडेन यांनी या कोरोनाच्या संकटात अमेरिका भारतसोबत असल्याचा विश्वास दाखवला.
“आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. “लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते,” असंही ते म्हणाले.
Had a fruitful conversation with @POTUS @JoeBiden today. We discussed the evolving COVID situation in both countries in detail. I thanked President Biden for the support being provided by the United States to India. — Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
Had a fruitful conversation with @POTUS @JoeBiden today. We discussed the evolving COVID situation in both countries in detail. I thanked President Biden for the support being provided by the United States to India.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
ते म्हणाले की, अमेरिका व्हेंटिलेटर आणि इतर साधन भारताला देईल. शिवाय कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा माल लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल. याबाबत मोदींना जो बायडेन आणि अमेरिकेचे आभार मानले. मोदींनी यावेळी लसीच्या मैत्रीबाबत देखील सांगितले की, कोवॅक्स आणि क्वाड लसीच्या पुढाकाराच्या माध्यमातून भारत दुसऱ्या देशांना कोरोना लस उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे लस आणि औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करावा, असे मोदी बायडेन यांना म्हणाले.
My discussion with @POTUS @JoeBiden also underscored the importance of smooth and efficient supply chains of vaccine raw materials and medicines. India-US healthcare partnership can address the global challenge of COVID-19. — Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
My discussion with @POTUS @JoeBiden also underscored the importance of smooth and efficient supply chains of vaccine raw materials and medicines. India-US healthcare partnership can address the global challenge of COVID-19.
अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.
यापूर्वी रविवारी एमएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एमएसए जेक सुलिवन यांच्याशी बातचित केली होती. ज्यानंतर अमेरिका कोरोना लसीच्या कच्चा मालावरील निर्यातीवर लावली रोख हटवण्यास तयार झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App